"जस्टीस" फॉर कन्हैय्या
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात ‘जेएनयु’ गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. देशप्रेम आणि देशद्रोह या विषयावर कन्हैय्या च्या माध्यमातून प्रसारमाध्यमे,संसद, न्यायव्यवस्था तसेच आम आदमी यांच्यामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु देशप्रेम व देशद्रोह यांच्या मुळाशी जाऊन कन्हैया प्रकरणाचा शोध घेतल्यास अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे अपोआप मिळू लागतात.कन्हैया चूक कि बरोबर यावर वादविवाद करण्यापेक्षा या विषयाकडे समन्यायी भूमिकेतून पाहणे गरजेचे ठरणार आहे. वास्तविक पाहता जेएनयु हा डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला आहे. AISF च्या माध्यमातून कम्युनिस्ट पक्ष आपल्या समाजवादी विचारसरणीचा प्रचार व प्रसार करत आहे. त्यामुळे या विद्यापीठावर आपले वर्चस्व असावे असे मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना वाटते त्यामुळेच काँग्रेस प्रणीत NCUI, बीजेपी शी निगडीत असणारी ABVP या संघटना आपले अस्तित्व दर्शवितात परंतु काँग्रेस वगळता अन्य पक्षांना येथे शिरकाव करता आलेला नाही. यंदा प्रमुख संघटना अनेक गटातटांत विभागल्या जाऊन एक उपाध्यक्ष पद ABVP च्या पदरात पडले ...