Posts

Showing posts from October, 2016

“शेतकरी उत्पादक कंपनी :उडान २०१६”

(लघु कृषक व्यापार संघ (SFAC), महाराष्ट्र व कृषी वित्त महामंडळ (AFC), नवी दिल्ली आयोजित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत उद्घाटन सत्रात केलेले  भाषण )                                                                                                                                              सन्माननीय व्यासपीठ आजच्या  कार्यक्रमाच्या   प्रमुख पाहुण्या श्रीमती संपदा मेहता (IAS) , प्रकल्प संचालिका MACP, राज्याचे विस्तार संचालक श्री. के.व्ही. देशमुख, कृषी आयुक्त श्री. विकास देशमुख यांचे राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीने मी स्वागत करतो. आणि आज या ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीच्या विकासाच्या योजना’ या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने मी आपणासमोर प्रातिनिधिक स्वरुपात   शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीचा आढावा सादर करत आहे.    महाराष्ट्र राज्यात उत्पादक कंपनी चळवळ जोर पकडू लागली आहे. सहकार व परस्पर सबंध या सूत्रात राज्यामधील छोटा व सीमित शेतकरी संघटीत होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. उत्पादक कंपनी संकल्पनेच्या माध्यमातून शेतीक्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उद्