नव्या भारताच्या विकासाचे पाश्चिमात्य मॉडेल’ शेती साठी आव्हानात्मक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९ चा अर्थसंकल्प संसदेत मांडून विकसित देशाचा विकसनशील ते विकसित भारताच्या परिवर्तनाचा नवीन अध्याय सुरु झाल्याची ग्वाही दिली आहे. २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ त्रिलीयन डॉलर करताना प्राथमिक क्षेत्र असणाऱ्या शेती क्षेत्राचा घसरत जाणारा टक्का आणि औद्योगीकरण व विशेषतः सेवा क्षेत्राचा विकासदर देशाला विकसित अर्थव्यवस्था करू शकतो हे पाश्चिमात्य विकासाचे मॉडेल घेऊन पुढे जात असल्याचा नारा दिला आहे. अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे अर्थसंकल्पीय नीती मांडली गेली. शेती क्षेत्राच्या विकासासाठी क्लस्टर दृष्टिकोनामधून समूहांना बळकट करण्याची नीती आखली आहे. आणि याचाच भाग म्हणून १०,००० शेतकरी उत्पादक कंपन्या नव्याने स्थापन केल्या जाणार आहेत. तसेच महिला बचत गटांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. शेती क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खाजगी उद्योजकांना हाक दिली आहे. तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि तेलाच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होणार असून त्याचाच एक टप्पा म्हणून सोयाबीनच्या हमिभावात देखील भरघोस ...