Posts

Showing posts from 2017
निसर्ग, शेती आणि   कृषी व्यवसायाचे नवनिर्माण २ 0 १७ या नववर्षाच्या आपणा सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नवीन संकल्पना व नवचेतना घेऊन आपण सर्वजण वाटचाल करण्याचा मनोदय करत असतो. ग्रामीण भागाच्या समृद्धीत भर घालण्यासाठी निसर्ग , शेती व कृषिव्यवसायाच्या नव्या आयामांचे सकारात्मक विश्लेषण करून केवळ आशावादी चित्र उभे न करता त्याला कृतीची जोड देण्याचा आपण सर्वजण संकल्प सोडूया. निसर्ग , पर्यावरण हे गेल्या काही वर्षात अत्यंत परवलीचे शब्द बनत चालले आहेत. विकासाची नवनवी शिखरे पादाक्रांत करताना निसर्गाकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा समतोल बिघडला. याचा परिपाक म्हणजे केवळ राज्यानेच नव्हे तर संपूर्ण देशाने दुष्काळाची मोठी झळ सोसली. जागोजागी निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य व त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम यामुळे पुन्हा एकदा ' पाणी अडवा , पाणी जिरवा ' चा केवळ नारा दिला गेला नाही , तर शासन , स्वयंसेवी संस्था , स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावकर्‍यांच...