मला भावलेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम....
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना प्रत्यक्ष पाहण्याचा व ऐकण्याची संधी ते राष्ट्रपती असताना २००६ मध्ये पुण्याला सिंबायोसिस विद्यापिठात काही कार्यक्रमासाठी आले असताना प्रथम भेटली होती. कलामांना ऐकण्यासाठी सिंबायोसिसच्या सेनापती बापट रोडवरील कॅम्पस मध्ये प्रवेश मिळणे मुश्कील होते परंतु मार्ग शोधत सभागृहाच्या दरवाजापर्यत पोहोचलो व कसेबसे वाट काढत कलाम पाहायला भेटले. त्यानंतर त्याचे ७-८ मिनिटे भाषण ऐकायला भेटले. अत्यंत सोप्या भाषेत विषय समजावून सांगायची त्यांची हातोटी होती. भाषण करताना ते विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधत होते. भाषण संपल्यानंतर एक कविता त्यांनी सर्व विद्यार्थांना पाठीमागे म्हणायला लावली. यावरून त्यांच्यातील हाडाचा शिक्षक दिसून येत होता. कलामांनी आपल्या देशभरातील लाखो मुलांना “Creativity” नावाची चार ओळींची कविता ऐकवली व आपल्या मागे म्हणायला लावली होती ती कविता पुढीलप्रमाणे होती- “Learning use Creativity. Creativity leads to thinking. Thinking Provides knowledge. Knowledge makes you great.” यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी पुण्याच्या बालेवाडी संकुलात १२ जानेवारीला युवक दिनाचे औ...